साकळाई पाणी योजनेसाठी खडकी येथे कृती समितीचा रास्ता रोको:गेल्या 25 वर्षांपासून होतेय मागणी

2 hours ago 2
साकळाई पाणी योजनेची मागणी २५ वर्षे जुनी आहे. फक्त निवडणूक वेळी फक्त आश्वासने दिली जातात. त्यानंतर काही कार्यवाही केली जात नाही. आता या योजनेसाठी जलसंपदा खाते पुणे यांच्या कार्यालासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला. खडकी, ता. नगर येथे साकळाई कृती समितीच्या वतीने रविवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले बोलत होते. आंदोलनादरम्यान कार्ले म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून साकळाई पाणी योजनेची मागणी होत आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आश्वासने दिली जातात. जनता विश्वास ठेवून त्यांना मतदान करते. निवडणूक जिंकली की, हेच नेते पुन्हा या साकळाई योजनेकडे पाहत पण नाहीत. तोंडी पाठिंबा आहे, असे सांगतात. पण पाठपुरावा करत नाहीत. पावसाळ्यात घोड धरणातून दरवर्षी १० ते १२ टीएमसी पाणी वाहून खाली जात आहे. या वाहून जाणाऱ्या पाण्यातून २ टीएमसी पाणी साकळाई पाणी योजनेसाठी दिल्यास पावसाळ्यात दुष्काळी नगर आणि श्रीगोंदे तालुक्यातील पाझर तलाव, बंधारे भरता येतील. त्याचा फायदा ३५ गावांतील शेतकऱ्यांना मिळेल. या मागणीसाठीच्या अंतिम पूर्ततेसाठीचा प्रस्ताव गेली काही महिने पुणे जलसंपदा खात्याकडे पडून आहे. पण त्यासाठी कोणताही राजकीय नेता पाठपुरावा करत नाही. या ठिकाणी रस्त्यावर उतरून काही लाभ होणार नाही. त्यामुळे जनतेची लढाई आता जनतेला हातात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी पुण्याच्या जलसंपदा खात्यात प्रस्ताव अडून आहे, तर त्या कार्यालयासमोरच आंदोलन करावे लागणार आहे. त्यामुळे यापुढील आंदोलने पुण्यातील जलसंपदा खात कार्यालयासमोर केले जातील, असे कार्ले यांनी सांगितले. यावेळी उद्योजक ज्ञानदेव भोसले, अमृत कोठुळे, नवनाथ कोठुळे, अनिल कोठुळे, सतीश रोकडे, श्रीपती रोकडे, शिवाजी कोठुळे आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article