राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी महेश शिंदे यांची निवड:आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून केले भरीव काम

2 hours ago 2
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांची निवड झाली आहे. 'राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे यांच्या निवडीचे पत्र दिले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून शिंदे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्यातील वक्तृत्व, विषयाची मांडणी करण्याची शैली, अभ्यासू वृत्ती लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर पक्षाची अधिकृत भूमिका व विचार मांडण्यासाठी प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. शिंदे यांनी गेली ४०-४५ वर्षे आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून भरीव काम केले आहे. या कामाच्या अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राज्यभर व्यापक काम करताना त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिंदे यांचा अनुभव येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चेबांधणीत महत्वाचा ठरणार आहे. पक्षाने प्रदेश कमिटीवर उपाध्यक्षानंतर आता प्रदेश प्रवक्तेपदी काम करण्याची संधी दिल्याचा आनंद आहे. यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानतो. येत्या काळात पक्षाची भूमिका व विचार अधिक सक्षमपणे व अभ्यासूपणे मांडण्यावर माझा भर असणार आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी सांगितले आहे. इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाईटवर देण्यात आला आहे, असेही राठोड यांनी सांगितले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article