Washim: मी, ई व्ही एम बोलतोय, मतदारामध्ये जनजागृती

2 hours ago 2

मानोरा(Washim):- येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याने निवडणूक विभागाद्वारे ई व्ही एम मशीन(EVM Machine) बाबत मतदारामध्ये असलेल्या अफवाचे निराकरण करण्यासाठी निवडणूक विभागाने गावो गावी जाऊन डिजिटल पडद्यावर दाखवून प्रत्यक्ष मतदान प्रकीयेची माहीती देत जनजागृती सुरु केली आहे.

आगामी काळात विधानसभेसाठी राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार

आगामी काळात विधानसभेसाठी राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारामध्ये ई व्ही एम मशीन बाबत काही लोकांनी अफवा पसरविल्या जात आहे. त्या दुर करण्यासाठी व मोठ्या संख्येने मतदार मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा याकरीता मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणुक विभागाने चार चाकी वाहणा वरील डिजिटल पडद्यावर लघुपट दाखवुन व प्रत्यक्ष ई व्ही एम मध्ये सामान्य मतदाराला कशा प्रकारे मतदान प्रक्रिया पार पाडता येईल यांचे प्रात्यक्षिक दाखवुन मतदारामध्ये जनजागृती अभीयान तालुक्यातील प्रत्येक गावात दि. १२ सप्टेबरपासुन सुरु केले असुन १० ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. तरी जास्तीत जास्त मतदारानी गावोगावी सुरु असलेल्या प्रात्यक्षिक मतदान प्रक्रीयेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार येवलीकर यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article