मुंबई गोवा महामार्गावर एसटीच्या टायरला आग Pudhari Photo
Published on
:
12 Oct 2024, 8:00 am
Updated on
:
12 Oct 2024, 8:00 am
महाड : मुंबई गोवा महामार्गावर मुंबई चिपळूण या एसटीच्या चालकाच्या मागील उजव्या बाजूस असलेल्या टायरला घर्षणाने आग लागत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपलब्ध वाहनांच्या आधारे गाडीच्या पुढे धाव घेऊन गाडी थांबवण्यास चालकाला भाग पाडले. त्यानंतर चालकालाही संबंधित गंभीर परिस्थिती लक्षात आली.
गाडीच्या टायरला लागलेल्या आगीचे आगीवर नियंत्रण करण्यासाठी महाड एमआयडीसीच्या केवा कंपनीत काम करणाऱ्या प्रतीक शिंदे या फायरमनने आपल्या कंपनीतील अधिकारी विकास उर्फ राजू सासणे यांच्याशी संपर्क साधून आगी विरोधात प्रतिबंधात्मक करावयाच्या कामांची मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. यावेळी गाडीमध्ये असलेले अग्निशमन सिलेंडर हे रिकामे असल्याने महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या गाडीतील अग्निशमन प्रतिबंधात्मक यंत्रणेने आगीवर मात करण्यात यश प्राप्त केल्याचे सांगितले.