अपघातानंतर कालव्यामधून बाहेर काढण्यात आलेली कारPudhari Photo
Published on
:
12 Oct 2024, 10:11 am
Updated on
:
12 Oct 2024, 10:11 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा येथील कैथलमध्ये शनिवारी (दि.12) कालव्यामध्ये कार कोसळल्याने एकाच कुटुंबातील तीन महिला आणि चार मुलींचा मृत्यू दुर्दैवी अंत झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील आठ जणांसह नऊ जण गाडीत होते. ते दसऱ्यानिमित्त बाबा राजपुरी यात्रेसाठी निघाले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताचे वर्णन हृदयद्रावक असल्याचे सांगितले आणि पीडितांच्या नातेवाईकांबद्दल शोक व्यक्त केला.