काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची पक्षातून हकालपट्टीFile Photo
Published on
:
12 Oct 2024, 12:14 pm
Updated on
:
12 Oct 2024, 12:14 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क: विधानसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या तोंडावर असताना काँग्रेसने आज (दि.१२) मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने अमरावतीमध्ये मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
ANI ने काँग्रेस प्रदेश कमिटीचे पत्र शेअर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आमदार सुलभा खोडके यांच्याविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरही सतत पक्षविरोधी काम केल्याच्या अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलाजी यांच्या निर्देशाववरून अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षांकरिता निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या पत्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही आहे.