किरकोळ वादातून तरूणावर धारदार तलवारीने वार:खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

2 hours ago 1
किरकोळ वादातून धारदार तलवारीने तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडीत घडली आहे. याप्रकरणी अन्वर युसूफ खान (वय -६० )आणि वशिम शेख यांच्याविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासिम बादशाह शेख (वय -३७ रा. भवानी पेठ ,पुणे)असे जखमीचे नाव असून, त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासिम हे चमनशहा चौकात चिकन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी अन्वर आणि वशिम यांनी त्यांच्यावर तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपींविरूद्ध शोधमोहिम सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करीत आहेत. वाघोतील ज्वेलर्समधून अडीच लाखांचे दागिने चोरीला सोन्याच्या बांगड्या खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये शिरून २ लाख ६० हजारांच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना वाघोलीतील ज्वेलर्स शोरूममध्ये घडली. याप्रकरणी दोन महिलांविरूद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील ज्वेलर्स शोरूममध्ये दोन महिला सोन्याच्या बांगड्या खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांनी दुकानातील सेल्समनचे लक्ष विचलित करून दुकानातील अडीच लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत. बसची वाट पाहत असलेल्या तरूणाचा मोबाइल चोरीस परगावी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या तरूणाच्या हातातील १ लाखांचा मोबाइल जबरदस्तीने चोरट्यांनी हिसकावून नेला. ही फातिमानगरमधील भैरोबानाला चौकात घडली आहे. याप्रकरणी प्रशांत राठोड (वय ४०, रा. आंबेगाव) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे फातिमानगरमधील भैरोबानाला चौकात बसचे लाईव्ह ट्रॅकिंग चेक करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील १ लाख रूपयांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस पालवे पुढील तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article