तरुणाकडून 500 रुपयांच्या 250 बनावट नोटा जप्त:पोलिसांकडून आरोपीला अटक

2 hours ago 1
पुणे शहरातील सहकार नगर मधील परिसरात एका तरुणाला संशयितरित्या फिरताना पोलिसांनी चौकशीसाठी थांबवले त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ ५०० रुपयांच्या तब्बल २५० बनावट नोटा पोलिसांना मिळून आलेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे. निलेश हिरानंद वीरकर (वय- ३३, रा. विष्णू गावडे चाळ, चिंचवड रेल्वे स्थानकासमोर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बनावट नोटा कोठून आणल्या, याबाबत पुढील तपास सुरु आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल पवार, महेश मंडलिक यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पीएमपी थांबा परिसरातून वीरकर धावपळीत जात होता. पवार आणि मंडलिक यांना संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरु केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. चौकशीत सदर पैसे हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर वीरकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पद्मनाळे यांनी ही कारवाई केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article