मंत्रालय हागणदारी मुक्त करायचे आहे:दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा महायुती सरकारवर टीकास्त्र

1 hour ago 1
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांचे देखील भाषण झाले. भाषणात संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच उद्योगपती स्व. रतन टाटा यांच्याविषयी देखील त्यांनी भाष्य केले. टाटा आणि ठाकरेंचा विश्वास म्हणून हा महाराष्ट्र, ही शिवसेना वादळात, संकटात ठाकरेंच्या मागे उभी राहिली, असे संजय राऊत म्हणाले. शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले, ही देवाची आळंदी आहे. चोरांची आळंदी आझाद मैदानावर भरली आहे. नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम. त्या आझाद मैदानाची तरी थोडी लाज राखा. गुलामांचा मेळावा आणि आझाद मैदानावर? अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा जो कारभार सुरू आहे, एका वाक्यात सांगायचे झाले तर कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हागून भरला दरबार, अशी घाण या लोकांनी महाराष्ट्रात केली आहे. हा शब्द संसदीय आहे. हागणदारी मुक्त गाव, ही सरकारची योजना आहे. तसे आपल्याला आता मंत्रालय हागणदारी मुक्त करायचे आहे, अशी टीका महायुती सरकारवर संसणजे राऊत यांनी केली आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, हरयाणामध्ये जे घडले ते महाराष्ट्रात घडणार नाही. महाराष्ट्रा वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. आज आम्ही इथे विचारांचे सोने लुटायला जमलेलो आहोत. पण काही लोक या राज्यात महाराष्ट्र लुटण्यासाठी एकत्र आलेले आहेत. ही लूट थांबवायची असेल, तर या राज्याची सूत्रे आपल्याला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यावी लागतील आणि महाराष्ट्र वाचवावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या मेळाव्यात लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article