आवक वाढल्याने दरात मोठी घसरण pudhari
Published on
:
18 Nov 2024, 9:39 am
Updated on
:
18 Nov 2024, 9:39 am
शहरातील भाजी मंडईमध्ये हिरव्या मिरचीची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. लसूण, मटार आणि गाजराचे दर वधारले आहेत. पालेभाज्या स्वस्त झाल्या असून कोथिंबिरीची जुडी दहा रूपये झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजार चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात प्रतिकिलो दर हिरवी मिरची 30 ते 40 रूपये, मटार 150 ते 160 रूपये, गाजर 100 रूपये, बिट 60 ते 80 तर मेथी, पालक 20 रूपये प्रति जुडीच्या दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजार आवक : क्विंटल
कांदा 438, बटाटा 858, आले 43, भेंडी 140, गवार 13, टोमॅटो 359, घेवडा 53, वांगी 99, काकडी 276, कारली 45, बीट 17, गाजर 47, टोमॅटो 359. फळभाजी ः 3323, फळे ः 249, पाले भाजी ः 46800
खायला चविष्ठ आणि रूचकर असलेल्या हरभरा भाजीला ग्राहकांची पसंती असल्याने शेतकर्यांनी विक्रीसाठी आणली. 100 ते 120 रुपये प्रतिकिलो दराने भाजीची विक्री झाली. महाबळेश्वर गाजराचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाल्याने प्रतिकिलो 100 रुपये दराने विक्री होत आहे. तर दिल्ली गाजराची आवक सुरू झाली असून, 70 ते 80 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.