परभणी विधानसभा सार्वत्रीक निवडणूक
परभणी (Parbhani Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार, राजकीय पक्ष यांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. या परवानग्या घेणे सोपे व्हावे, यासाठी प्रशासनाकडून तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. १७ नोव्हेंबर पर्यंत या कक्षामधुन विविध प्रकारच्या ४२१ परवानग्या देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रचारासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागतात. यात हेलिकॉप्टरची परवानगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत दिली जाते. तर उर्वरीत परवानग्या निवडणूक निर्णय अधिकारी व संबधीत विभागाकडून दिल्या जातात. (Parbhani Assembly Elections) परभणी विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदिप राजपुरे यांच्या सहकार्याने परभणी तहसील कार्यालयात एक खिडकी कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षामधुन उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विविध परवानग्या देण्यात आल्या. १७ नोव्हेंबर पर्यंत ४२१ परवानग्या देण्यात आल्याची माहिती कक्ष प्रमुख तथा नायब तहसीलदार विष्णु पकवाने यांनी दिली.
या परवानग्या दिल्या
परभणी तहसील कार्यालयातील (Parbhani Assembly Elections) एक खिडकी कक्षातून विविध परवानग्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये सभा ८, तात्पुरते प्रचार कार्यालय २८, रॅली व झेंडी परवानगी ८, पदयात्रा ३१, वाहन परवाना १७३, तीनचाकी सायकल रिक्षा परवाना ३९, बलुन परवानगी १५, ड्रोन परवानगी ४ आणि बॅनर होर्ल्डींगच्या २८ परवानग्या देण्यात आल्या आहेत.