भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या १० कोटींहून अधिक आहे. या आजारामुळे पाहायला गेलं तर अनेक लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. मधुमेहाचा शरीरावर काय परिणाम होतो, याविषयी ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात नुकताच एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. यात टाइप-१ आणि टाइप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्याचा धोका सामान्य लोकांपेक्षा दोन ते तीन पट जास्त असल्याचे समोर आले आहे. तसेच या रुग्णांमध्ये मानसिक चिंता वाढण्याची शक्यताही २० टक्क्यांनी जास्त असते.
एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे कि, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये काही प्रकारचे हार्मोन्स बिघडत असतात त्यामुळे त्यांच्यात मानसिक समस्या अधिक उद्भवतात. काही लोकं असे असतात ज्यांना मधुमेह झाल्यानंतर इतर आजार होण्याची भीती असते. या रुग्णांना त्यांच्या आहारात बराच बदल करावा लागतो. त्यांना बरेच काही गोष्टी खाणे टाळावे लागते. त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या भीतीमुळे चिंता निर्माण होते. या रुग्णांनी सतत जरचिंता करत राहिल्यास त्यांच्या मध्ये नैराश्याचे कारण बनते. द लॅन्सेटच्या अभ्यासानुसार, साखरेची पातळी वाढण्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होतो. त्याचा मेंदू, फुफ्फुस, हृदयावर परिणाम होत असतो. जेव्हा त्याचा परिणाम मेंदूवर जास्त होतो, तेव्हा या लोकांचे मानसिक आरोग्य बिघडवू शकतो.
मधुमेहाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?
दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील मेडिसिन विभागातील डॉ. अजित कुमार सांगतात की, साखरेची वाढलेली पातळी मानसिक आरोग्य बिघडते आणि त्याला मधुमेहाचा त्रास म्हणतात. जर शरीरातील साखरेची पातळी जास्त काळ वाढलेली राहिली तर मेंदूमध्ये असलेल्या न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन बिघडू शकते. यामुळे मानसिक आरोग्यही बिघडते. मधुमेहामध्ये ऑक्सिडेटिव्ह तणावाची पातळी देखील वाढते. यामुळे चिंता आणि नैराश्य देखील उद्भवू शकते.
डॉ. कुमार म्हणतात की, जगभरात मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकांना मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, २०२२ मध्ये भारतात मधुमेहाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदली गेली, जी जगातील ८२८ दशलक्ष प्रकरणांपैकी एक चतुर्थांश असल्याचं सांगितले आहे.
मधुमेह कसा टाळावा?
दररोज व्यायाम करा
खाण्यापिण्याची काळजी घ्या
मानसिक ताण घेऊ नका
जास्त गोड पदार्थ खाऊ नका
लठ्ठपणा नियंत्रणात ठेवा