देवेंद्र फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात:राज्यात 64 ठिकाणी रॅली, रोडशो, सभा; आर्वीत केली प्रचाराची सांगता

2 hours ago 1
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या, म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली. हा प्रवास त्यांनी 25 पेक्षा अधिक जिल्ह्यात केला असून, उर्वरित जिल्ह्यांत व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधीत्त्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना मोफत वीज, दिवसा वीज, सौरकृषीपंप, एक रुपयांत पीकविमा, यासह सरकार येताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा, असे अनेक मुद्दे मांडले. लाडकी बहीण, लेक लाडकी, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दीदी या महिलांसाठीच्या योजना त्यांनी भाषणातून मांडल्या. लाडक्या बहिणींना आता 1500 वरुन 2100 रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच स्थानिक सिंचनाचे प्रकल्प, उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला. हे ही वाचा... विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा संपला:आता भेटीगाठी व गुप्त बैठकांवर जोर, ECची नजर; बुधवारी मतदान, शनिवारी निकाल मागील 4 आठवड्यांपासून राज्यभर सुरू असणारा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अखेर सोमवारी सायंकाळी 6 वाजता खाली बसला. आता राजकीय पक्षांकडून भेटीगाठी व गुप्त बैठकांद्वारे मतदारांपर्यंत प्रयत्न सुरू होणार आहे. यात मतदारांना पैसे व भेटवस्तू वाटण्याचेही प्रकार होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे. दरम्यान, आता प्रचारसभा, रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली आदींचा दणदणाट शांत झाला असून, अवघ्या महाराष्ट्राला बुधवारी होणाऱ्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सविस्तर वाचा... महाराष्ट्रात भाजपला झटका, बहुमत कठीण:महायुतीला 125-145 जागा, महाविकास आघाडीला 132-155 जागा मिळण्याची शक्यता 'महाराष्ट्रात कुणालाही बहुमत मिळण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट आहे. यावेळी लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवार 25 जागा जिंकू शकतात, याचा अर्थ ते सरकार स्थापन करतील. राजकीय तज्ज्ञ संदीप सोनवलकर यांचा अंदाज खरा ठरला तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा तोडफोडीचे राजकारण सुरू होऊ शकते. राज्यातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याआधी दिव्य मराठीने वाऱ्याची दिशा समजून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, तज्ज्ञ आणि राजकीय पक्षांशी संवाद साधला. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article