हिंगोली शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Crime) : ऊसतोड मजुरदार असल्याचे दर्शवून दोन आरोपींनी ऊसतोड ठेकेदाराकडून ८० हजार रूपयाची उचल करून सदर व्यक्तीला फक्त २ हजार रूपये देऊन घरी पाठविल्याने त्यांच्या या कृत्यामुळे हिंगोली शहरातील बावनखोली भागातील ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने दोघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील बावनखोली भागातील प्रल्हाद गणपत आठवले (५२) ही व्यक्ती कधीही ऊसतोडीसाठी गेलेली नसताना त्यांच्या भोळ्यापणाचा फायदा दोघांनी घेऊन त्यांना दारू पाजवून त्यांच्या नावे ऊसतोडीच्या ठेकेदाराकडून ८० हजार रूपयाची नगदी उचल करून करून घेतली त्यापैकी प्रल्हाद आठवले यांना फक्त २ हजार रूपये देऊन घरी पाठविले. अशा (Hingoli Crime) प्रकारामुळे प्रल्हादला या दोन्ही व्यक्तींनी केलेल्या कृत्याचा खूप त्रास झाला.
हा त्रास अधिक असहाय्य झाल्याने त्यांनी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्सेस विकास गवारे रा.ब्राम्हणवाडा, सागर देवकते रा.अण्णाभाऊ साठे नगर हिंगोली हे दोघे कारणीभूत असल्याप्रकरणी १७ नोव्हेंबरला हिंगोली शहर पोलिसात मयताची पत्नी सुमनबाई आठवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास गवारे, सागर देवकते या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या (Hingoli Crime) प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल महीपाळे हे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी भेट दिली.