Student suicide Case: पॉलिटेक्निकलचा एक विषय राहिल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

2 hours ago 1

सेनगाव शहरातील घटना

हिंगोली (Student termination Case) : सेनगाव शहरातील जैन मंदिराजवळील २१ वर्षीय विद्यार्थ्याने अंतीम वर्षाचा एक विषय निघत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या (Student termination Case) केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनगाव शहरातील जैन मंदिराजवळील शंतनू रविंद्र बोराळकर (२१) हा हिंगोली येथे तंत्रनिकितेन महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

अंतीम वर्षाचा एक विषय तीन वेळा देऊनही निघत नसल्याने तो नेहमी चिंतेत राहायचा. त्याने १७ नोव्हेंबर रोजी सेनगाव शेत शिवारातील गट क्रमांक ४५७ मध्ये झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Student termination Case) केली. याप्रकरणी रविंद्र बोराळकर यांनी सेनगाव पोलिसात दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजोबा, आजी असा परीवार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article