Published on
:
18 Nov 2024, 11:23 am
Updated on
:
18 Nov 2024, 11:23 am
भोकर : भोकर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने सर्वच बाबीमध्ये आघाडी घेतली असून भाजपाचे कार्यकर्ते जीव ओतून काम करत आहेत. काँग्रेसकडून मराठा कार्ड चालविला गेला असल्याने बहुतांश ओबीसी मतदार काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारावर नाराज असून याचा फटका काँग्रेसला बसणार असल्याचा अंदाज राजकीय जानकारातून व्यक्त होत आहे.
भोकभ विधानसभा मतदारसंघावर चव्हाण घराण्याचे पूर्वी पासून वर्चस्व आहे. के. शंकरराव चव्हाण, अशोकराय श्रीजया चव्हाण चव्हाण, अमिता चव्हाण यांनी या मतदार संघाचे नेतृत्य केले असून आता श्रीजया चव्हाण भाजपाकडून हि निवडणूक लढवित आहेत. विधानसभा क्षेत्रातील सुधा प्रकल्प वगळता सिंचनाच्या सर्व सुविधा शंकरराव व अशोकराव यांनी निर्माण निर्माण केल्या आहेत. यासोबतच अनेक विकास कामे बव्हाण घराण्याच्या नावावर आहेत. यामुळे श्रीजया चव्हाण यांची हि वाजू भक्कम राहिली आहे. तर काँग्रेस कडून उभे असलेले पप्पू कोंडेकर हे नवखे उमेदवार असून त्यांच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत अशोकराव चव्हाण यांचा मोठा आधार होता.
हे सर्वसामान्य मतदार जागून आहे. कोंडेकर च्या प्रचार यंत्रणेत सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग या मुद्यापेक्षा मराठा कार्ड चालविले जात आहे. विकासाचा असा कसलाच अजेंडा नसल्यामुळे त्यांची प्रचाराची बाजु काही प्रमाणात लंगडी ठरली आहे. यात सोशल मीडिया, चर्चा मध्ये मराठा कार्ड चालविले जात असल्याने ओबीसी मतदार प्रचंड नाराज असून याचा फटका पप्पू कोंडेकर सोबतच लोकसभेचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांना बसणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. काही ओबीसी नेते काँग्रेस चा प्रचार करत असले तरी सतत मराठा कार्ड मुळे हे नेते हि नाराज होत आहेत.
प्रचार यंत्रणेची एकंदरीत परिस्थिती पाहता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा कडून आपाड़ी मेतली असून भाजपाचे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तर प्रचारात काँग्रेस मंत्रणा कमी पडत आहेत.
भाजपा कडून भोकर शहरातील डॉक्टर च मेडिकल असोसिएशनची बैठक घेतली गेली. या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तईतर काल काँग्रेस कडून अशीच बैठक ठेवण्यात आली पण याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.