प्रश्न सोडवले, पण राजकारणासाठी नव्हे : नितीन गडकरी

1 hour ago 1

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मागील दहा वर्षांमध्ये हलबा समाजाचे अनेक प्रश्न सोडवले. पण हे सर्व राजकारणासाठी नव्हे, तर समाजासोबत असलेल्या ऋणानुबंधांमुळे केले, असे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मध्य नागपुरातील गोळीबार चौकात आयोजित विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते.

60 वर्षे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका काँग्रेसकडे होते. पण एवढ्या वर्षांमध्ये नागपूरचा विकास झाला नाही. मात्र, आपण दहा वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला. नाहीतर सेंट्रल अव्हेन्यू रोडच्या वरून मेट्रो धावू शकते, असा विचारही कुणी केलेला नव्हता. लवकरच नेताजी मार्केट, कॉटन मार्केट, संत्रा मार्केटचा विकास होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. 

या मतदारसंघात काँग्रेस - भाजप थेट लढतीत हलबा समाजाच्या अपक्ष उमेदवाराने त्रिकोणी लढतीची शक्यता निर्माण केली आहे. हलबा समाजाला यावेळी तिकीट नाकारण्यात आल्याने असंतोष कुणाच्या पथ्यावर पडणार हे लवकरच उघड होणार आहे.

गडकरी म्हणाले की, नागपूर एज्युकेशन हब झाले आहे. इथे रोजगार निर्माण झाला. हेल्थ हब म्हणून नागपूर विकसित होत आहे. नागपुरातील रस्ते सुंदर झालेत. कुठल्याही समाजावर अन्याय न करता नागपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला. ‘सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास आणि सबका विकास’, हेच आमचे ध्येय आहे, असा निर्धार व्यक्त केला. मध्य नागपूरचे भाजप-महायुतीचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ या सभेत आमदार विकास कुंभारे, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, माजी महापौर अर्चना डेहनकर आणि दयाशंकर तिवारी, रविशंकर कुंभारे, राजेंद्र रंधनकर, गिरीश देशमुख, सुरेश गोजे, बंडू राऊत, दीपराज पार्डीकर, सुबोध आचार्य, रामभाऊ आंबुलकर, भास्कर पराते, श्रद्धा पाठक आदींची उपस्थिती होती.  

दरम्यान, आता कामठी-कन्हानपर्यंत मेट्रो येणार आहे. गावातील रस्ते चांगले होणार आहेत. या भागात भविष्यात चांगले मार्केट्स उभे होणार आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारार्थ गडकरी यांची तत्पूर्वी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी माजी मंत्री सुलेखा कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article