टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेआधी कसून सराव करत आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत 4-1 ने विजय मिळवायचा आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सर्व खेळाडू पर्थ येथे जीव तोडून सराव करत आहेत. मात्र ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचे काही खेळाडू त्रस्त आहेत. या खेळाडूंच्या त्रासाचं कारण ही अजब आहे. नक्की कशाचा त्रास होतोय? याबाबत टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सांगितलं आहे. बीसीसीआयने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत सर्व काही सांगितलंय. ऑस्ट्रेलियात चालून चालून त्रस्त झाल्याचं यशस्वीने म्हटलंय.
“ऑस्ट्रेलियात फार चालावं लागतं”
ऑस्ट्रेलियात फार चालावं लागतं, असं यशस्वीने बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हीडिओत म्हटलंय. तु किती स्टेप्स चालला? यशस्वीने असा प्रश्न वेगवान गोलंदाज आकाश दीप याला केला. मला माहित नाही, मात्र किमान 3 किलोमीटर चाललोय, असं उत्तर आकाश दीप यशस्वीला देतो. भारतात क्रिकेट चाहत्यांमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना चालण्याची फार संधी मिळत नाही. क्रिकेटर दिसला की चाहते त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र त्या तुलनेच पर्थमध्ये बऱ्यापैकी खेळाडू बाहेर फिरू-हिंडू शकतात.
4 हजार डॉलर खर्च
टीम इंडियाचा फलंदाज सर्फराज खान या व्हीडिओत प्रश्न विचारतो. आतापर्यंत किती ट्रॅव्हल अलाउन्स (प्रवास खर्च) खर्च केला? असं सर्फराज अभिमन्यू ईश्वरनला विचारतो. यावर अभिमन्यू ईश्वरन उत्तर देतो. ऑस्ट्रेलियात 20-25 दिवसांपासून आहे. आतापर्यंत 4 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये खर्च केलेत, असं ईश्वरन म्हणतो.
टीम इंडियाच्या खेळाडंची प्रश्न-उत्तरं
#TeamIndia Questions..
..And Answers❗️
📸 Presenting India’s Headshots Session ft. 𝗔𝘀𝗸 𝘁𝗵𝗲 𝗡𝗲𝘅𝘁 𝗢𝗻𝗲 😎
WATCH 🎥🔽 – By @RajalArora | #AUSvIND https://t.co/POrSOOezHS
— BCCI (@BCCI) November 18, 2024
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.