मतदान प्रक्रियेसाठी हिंगोली प्रशासन सज्ज:मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेण्यास मनाई, जिल्हाधिकारी गोयल यांची माहिती

1 hour ago 1
हिंगोली जिल्ह्यात मद्य, रोकड, मैाल्यवान वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी पोलिस विभागाचे वाढीव १८ पथके तैनात करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असून मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सोमवारी ता. १८ पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार, निवडणुक उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे उपस्थित होते. पोलिसांची वाढीव १८ पथके तैनात यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात १०१५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी ता. १९ मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना केले जाणार आहे. मतदान प्रक्रियेच्या कालावधीत मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तातडीने दुसरे मतदान यंत्र पाठविले जाणार असून त्या त्या भागातील झोनल अधिकाऱ्यांकडे हे यंत्र राखीव असणार आहेत. मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन येऊ नये असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून पोलिसांची वाढीव १८ पथके तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल व लॉजची तपासणी सुरू यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनीही माहिती दिली. जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात २००० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून यामध्ये राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा बलाच्या जवानांचा समावेश आहे. जिल्ह्यात हॉटेल, लॉजची तपासणी सुरु करण्यात आली असून मतदान केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या शिवाय दिवसा व रात्रीच्या वेळी गस्त असणार आहे. वाहनांच्या तपासणीसाठी राज्य राखीव दल व सीमा सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात केल्याचे त्यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article