उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील 24 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले. या तरुणाने इन्स्टाग्राम लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने लाईव्ह करत झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म मेटाने लागलीच उत्तर प्रदेश पोलिसांना अलर्ट पाठवला. लोकेशन आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केला. अवघ्या 12 मिनिटात पोलिसांनी 9 किमीचे अंतर कापत या तरुणाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
मेटाने वाचवला प्राण
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा तरुणा शाहजहांपूर जवळील भूडिया गावातील रहिवाशी आहे. या 24 वर्षीय तरुणाने गुरूवारी रात्री इन्स्टाग्रामवर लाईव्ह केले. त्याचवेळी त्याने झोपेच्या गोळ्या खाल्या. या व्हिडिओविषयी मेटाच्या सोशल मीडिया सेंटरने अलर्ट दिला. तेव्हा पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. मेटाने पोलिासंनी व्हिडिओ आणि लोकेशन अलर्ट रात्री 11:05 वाजता पाठवला. पोलिस मुख्यालयातून शाहजहांपूर पोलिसांना याची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी नऊ किलोमीटरचे अंतर झपाट्याने कापले. जिथे लोकेशन मिळाले तिथून तरुणाला रुग्णालयात हलवले.
हे सुद्धा वाचा
हे अंतर, रस्ता पाहता पोलिसांना 15 मिनिटं लागण्याची शक्यता होती. गुगलने पण तसाच अंदाज वर्तवला होता. पण पोलिसांनी युवकाचे प्राण वाचवण्यासाठी वेगाने पोलिस वाहन दामटले. पोलिस 12 व्या मिनिटाला घटनास्थळी होते. पोलिस घटनास्थळी पोहचली तेव्हा हा तरुण बेशुद्ध झाला होता. त्याला तात्काळ कटरा येथील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपाचारनंतर आता तरुणाची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुग्णालयाने सुट्टी दिली आहे.
आई-वडिलांनी झापल्याने आला राग
या तरुणाच्या हरकतींमुळे आई-वडील त्याच्यावर रागवले होते. त्यांनी त्याला चांगलेच सुनावले. यामुळे तो चिंतेत होता. रागा रागात त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी मेटामुळे हे शक्य झाल्याचे त्याच्या घरच्यांना सांगीतले आणि आई-वडिलांसह तरुणाला समज दिली. दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला. मेटाच्या सोशल मीडिया अलर्ट सेंटरने वेळीच घटनेची माहिती दिल्याने तरुणाचे प्राण वाचले. पोलिसांनी पण वेळीच मदत पोहचवली. या नवीन तंत्रज्ञानाची आता चर्चा होत आहे.