अदानी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा टोला:म्हणाले - कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर स्फोट मोठा झाला असता
5 hours ago
1
कालचा बॉम्ब चार दिवस आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडेंच्या कॅश कांड आणि अदानी प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना केंद्र सरकारवर हल्ला चढवला. काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता. १९ तारखेला एक बॉम्ब फुटलेलाच आहे. वसई-विरार येथे नोटांचा बॉम्ब आधीच फुटलेला आहे. तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे. कालच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश नव्हे तर जग हादरले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता या घोटाळेबाजांचे काय करणार? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सचिन शिंदेंना पश्चाताप होणार नाही उद्धव ठाकरे म्हणाले, सचिन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो. सचिन शिंदे यांनी मांडलेल्या व्यथेवरून त्यांच्याबाबत अन्याय झाला नाही, पण न्याय देखील मिळाला नाही. तुम्ही शिवसेनेत आलात, त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही, हा मी शब्द देतो. व्यक्तिगत काही मिळाले म्हणजे न्याय नाही. माझा उपयोग माझ्या जनतेला काय देऊ शकलो हा न्याय असतो. तशी संधी मी त्यांना नक्की देईन. सचिन शिंदे यांनी जनतेसाठी जे काही करायचे ठरवले आहे, ते करण्याची मी त्यांना संधी देईल, असे वचन उद्धव ठाकरे यांनी सचिन शिंदे यांना दिले. नेमके काय आहे प्रकरण?
न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी ऑफिसचे म्हणणे आहे की अदानी यांनी भारतातील सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स (सुमारे 2110 कोटी) लाच देण्याचे आश्वासन दिले होते. अदानींव्यतिरिक्त, सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांचा इतर सात लोकांमध्ये समावेश आहे. हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलत असल्याचा आरोप आहे. अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेल्याने अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आणि अमेरिकन कायद्यानुसार तो पैसा लाच म्हणून देणे गुन्हा आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)