Mike Tyson vs Jake Paul Fight : महामुकाबल्यात चॅम्पियन बॉक्सर माइक टायसनचा दारुण पराभव, कोणी हरवलं?

3 hours ago 1

जगातील महान बॉक्सरमध्ये गणना होणाऱ्या माइक टायसनचा दारुण पराभव झाला आहे. 27 वर्षाचा युवा बॉक्सर जेक पॉलने ऐतिहासिक सामन्यात माइक टायसनचा पराभव केला. जेक पॉलने संपूर्ण सामन्यात टायसनवर वर्चस्व गाजवलं. त्याने टायसनच्या शरीरावर आणि चेहऱ्यांवर जोरदार पंचेसचा प्रहार केला. जेक पॉलने 78-74 ने हा सामना जिंकला. सामन्याच्या अखेरीस पॉलने टायसनसमोर झुकून त्याला सन्मान दिला. मॅचच्या सुरुवातीला 58 वर्षाच्या टायटसनने चांगली सुरुवात केली होती. पॉलने चलाखी दाखवत त्याचे वार सहन केले आणि त्याला थकू दिलं. त्यानंतर जेक पॉलने आपले प्रहार सुरु केले. शेवटपर्यंत तो टायसनवर भारी पडला.

माइक टायसनने आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या राऊंडमध्ये त्याने पॉलला कॉर्नरमध्ये ढकलून पंचेस मारले. पॉलने टायसनच्या पंचेसचा धाडसाने सामना केला. दुसऱ्या राऊंडमध्ये टायसनने दोन पंच मारले. त्यानंतर जेक पॉल वेगाने रिंगमध्ये आला. टायसन थकल्यानंतर जेकने त्याच्यावर पंचेसची बरसात केली. दुसऱ्या राऊंडमध्ये जेक पॉल पूर्णपणे आक्रमक होता. तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये टायसन बचावात्मक खेळताना दिसला.

माइक टायसनच पुन्हा पुनरागमन

पाचव्या राऊंडमध्ये माइक टायसनने पुन्हा पुनरागमन केलं. दोघांमध्ये जबरदस्त सामना पहायला मिळाला. दोघांनी शेवटपर्यंत खेळण्याचा निर्णय घेतला. सहाव्या राऊंडपर्यंत नॉकआऊट झाला नाही. त्याचा फायदा पॉलला झाला. टायसनवर त्याच्या वयाचा परिणाम दिसून आला. तो पंच मारण्याचा प्रयत्न करत होता. पण यूट्यूबर बॉक्सर पॉल निसटण्यात यशस्वी ठरला. अखेरीस पॉलने सर्वसंमतीने ऐतिहासिक विजय नोंदवला.

किती पैसा मिळणार?

रिपोर्ट नुसार जेक पॉलला या सामन्यासाठी 40 मिलियन अमेरिकी डॉलर (337 कोटी रुपये) मिळणार आहेत. टायसनला हरल्यानंतरही 20 मिलियन अमेरिकी डॉलर (168 कोटी रुपये) मिळतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article