Nagar News – कोपरगाव-नगर महामार्गावर कंटेनर-दुचाकीचा अपघात, एक ठार; एक गंभीर जखमी

2 hours ago 2

कोपरगाव-नगर महामार्गावर कंटेनर व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मुजिब जाहीद खान पठाण (44) असे मयताचे नाव आहे. तर मुजिबचे सासरे उस्मान खा हसन खान पठाण हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.

कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील पुणतांबा चौफुली नजीक जुनी गंगा जगदंबा देवी मंदिराजवळ हा अपघात घडला. कोपरगाववरून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या मोटर सायकलला कंटेनरने मागवून धडक दिल्याने मुजीब जाहिद खान पठाण हा जागीच ठार झाला. उस्मान खान पठाण हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटना घडताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमीला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोपरगाव येथील एसजेएस हॉस्पिटल येथे दाखल केले. मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला.

सदर घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मयत मुजिब जाहीद खान पठाण यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सदरील घटनेचा शहर पोलिसांनी पंचनामा करत कंटेनर ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. या घटनेत मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, नगर मनमाड महामार्गाचे काम संथगतीने चालू असून जुनी गंगा देवी मंदिर ते पुणतांबा चौफुली या दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात कायम होत असून हा महामार्ग आणखी किती बळी घेणार असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे. या महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत तरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे, या रस्त्यावरील वाहतुकीला नियंत्रण ठेवावे अशी मागणी होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article