Nagpur: सरकारी शाळा बंद करून जमिनी हडपण्याचा डाव..

2 hours ago 1

नागपूर (Nagpur) :- कॉर्पोरेट घराण्यांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आणि समाजाच्या मालकीच्या शाळा बंद करण्याच्या षडयंत्रात सर्व प्रथम असलेल्या संस्थेचा शैक्षणिक गुणवत्तेबाबतचा सन २०२४ चा अहवाल नेहमीप्रमाणे सरकारी शाळांची बदनामी करणाराच आहे. शाळांचा दर्जा कसा सुधारेल, यावर भर कमी आणि बदनामीवर जास्त दिला जात आहे. यावरून सरकारी शाळा बंद करून जमिनी हडपण्याचा हा डाव असल्याचा खळबळजनक आरोप शिक्षकांनी केला आहे.

आठवीच्या मुलांना वाचताच येईना… विद्यार्थ्यांच्या वाचनाची पाटी कोरी…

‘असर’ या संस्थेच्या अहवालातून सरकारी शाळांच्या (Govt School) गुणवत्तेच्या बाबतीत वस्तुनिष्ठ असे काहीतरी सकारात्मक येईल अशी अपेक्षा आता कुणीच ठेवत नाही. राज्यातील शिक्षकांनी या अहवालाची होळी करून निषेध नोंदवावा, असे आवाहनही शिक्षक संघटनेने केले आहे. सरकारी शाळा बंद झाल्या पाहिजे, असा असर होण्यासाठीच वर्षानुवर्षे हा अहवाल येत आहे. आठवीच्या मुलांना वाचताच येईना… विद्यार्थ्यांच्या वाचनाची पाटी कोरी… अशा प्रकारचे मथळे असणाऱ्या सनसनाटी बातम्या करायला आणि जनसामान्यांमध्ये सरकारी शाळा म्हणजे एकदम टाकाऊ अशा प्रकारची मानसिकता तयार करायला खतपाणी घालणारा अहवाल राहिला आहे, असा आरोपही शिक्षक संघटनांकडून होत आहे. हे एक थंड डोक्याने चालविलेले षडयंत्रच आहे अशाप्रकारे सरकारी शाळा सुधारणेचा पाया रोवण्याऐवजी तो कमकुवत कसा होईल असाच प्रयत्न दरवेळी संस्थेच्या अहवालातून समोर आला आहे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article