निमाच्या मुख्य शाखेच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. प्रतिभा वाघ यांनी माजी अध्यक्ष डॉ. सुजित सुराणा यांच्याकडून स्वीकारली.Pudhari News network
Published on
:
04 Dec 2024, 8:38 am
Updated on
:
04 Dec 2024, 8:38 am
नाशिक : नॅशनल-- इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेचा पदग्रहण सोहळा आयएमए हॉल येथे पार पडला. निमाच्या मुख्य शाखेच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. प्रतिभा वाघ यांनी माजी अध्यक्ष डॉ. सुजित सुराणा यांच्याकडून स्वीकारली. (Nashik Industries & Manufacturers Association (NIMA))
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा आणि विविध फोरम्सचा पदग्रहण सोहळा आयएमए हॉल शालिमार येथे पार पडला. निमाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार डॉ. प्रतिभा वाघ यांनी स्वीकारला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, केंद्रीय निमाचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, केंद्रीय वूमेन्स फोरमच्या संस्थापक डॉ. साधना कुलकर्णी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी निमाचे राज्य अध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी होते. निमा कार्यकारिणीत सचिव डॉ. संगीत लोंढे, खजिनदार डॉ. तुषार निकम, संघटक डॉ. दीप्ती बढे यांनी पदभार स्वीकारला. तसेच वूमन्स फोरम अध्यक्ष डॉ. अनघा चव्हाण, सचिव डॉ. सेजल संघवी खजिनदार डॉ. गिरीशा देवरे, संघटक डॉ. शीतल जाधव यांची निवड झाली. निमा संघटनेच्या आयुर्वेद फोरम अध्यक्षपदी डॉ. माधुरी करमरकर, सचिव डॉ. योगेश चव्हाण, खजिनदार डॉ. दीपाक्षी भांडारकर व संघटक डॉ. रवींद्र फडोळ यांनी पदभार स्वीकारला. तसेच एन. एच. एम.फोरमच्या अध्यक्षपदी डॉ. अमोल साळुंखे, तर सचिवपदी डॉ. दुष्यंत सांगळे यांनी सूत्रे स्वीकारली.