दिंडोरी तालुक्यात थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून शेतीच्या कामकाजावरही परिणाम जाणवत आहे. करंजवण, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव आदी धरण परिसरात सकाळच्या सुमारास आल्हादायक वातावरण निर्माण होत असल्याने नागरिक त्याचा आनंद घेताना दिसत आहे. वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पाेषक मानली जात असल्याने शेतकरी सुखावले आहेत. काही भागांत विविध पिकांच्या लागवडीला उशीर झाला असला तरी गहू, हरभरा आदी पिकांच्या लागवडीने सर्वत्र वेग घेतला आहे. सध्या पहाटे थंडी, दुपारी ऊन व रात्री पुन्हा गारवा असा प्रकार पहावयास मिळत आहे. हवेतील गारवा, धूळ, मातीचे कण, आहारातील बदल अशा अनेक कारणांमुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा त्रासांचा समावेश आहे. यंदा कोरड्या खोकल्याची समस्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्ण हैराण झाले आहेत. तात्पुरता औषधोपचार आणि घरगुती उपाय योजनांनी दोन-चार दिवसांत खोकला बरा होत असायचा मात्र सध्या आठ ते दहा दिवस उलटूनही सर्दी, खोकल्याने नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Nashik | तापमानाचा पारा घसरला; दिंडोरी तालुक्यात हुडहुडी
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Nashik | तापमानाचा पारा घसरला; दिंडोरी तालुक्यात हुडहुडी
Related
नव्या सरकारचा शपथविधी कधी?; राहुल नार्वेकरांनी तारीख सांगितल...
6 minutes ago
0
Sharad Pawar : ‘राज्यात जे काही चाललंय ते…’, महायुतीच्या रखड...
6 minutes ago
0
अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी याचिकाः:निवडणूक शपथ पत्रात खो...
8 minutes ago
0
दर्श अमावस्येला करा हे पाच उपाय, पितरांना मिळेल शांती
9 minutes ago
0
एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी का गेले?:आदित्य ठाकरे आकाशाकड...
12 minutes ago
0
मुख्यमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदे यांनी मागितले हे मोठे पद, पक्...
15 minutes ago
0
ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, ‘त्या’ गोष्टीवरही विश्वास बसतोय; ...
18 minutes ago
0
AUS vs IND : दुसऱ्या कसोटीतून गोलंदाज बाहेर, दोघांची एन्ट्री...
20 minutes ago
0
आमचा नेता खूश नाही आणि आम्हीही:शिवसेना नेत्याचे सूचक विधान, ...
24 minutes ago
0
Railway Accident: रेल्वे विभागाचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या वि...
25 minutes ago
0
ATM मधून काढता येणार PF चे पैसे; जाणून घ्या काय आहे EPFO नवी...
26 minutes ago
0
Nashik Traffic Rule | बेशिस्त वाहनचालकांना 75 हजारांचा दंड
27 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT