Published on
:
07 Oct 2024, 4:18 am
Updated on
:
07 Oct 2024, 4:18 am
चांदवड : भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवान सचिन सुरेश सूर्यवंशी (३४) यांचा पश्चिम बंगाल येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सूर्यवंशी हे वडनेरभैरव येथील वरच्या कोळीवाड्यातील आहेत. वडनेरभैरव येथील सुरेश सूर्यवंशी या शेतमजुराचा मुलगा सचिन हा सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत होता. ड्युटीवर असताना शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
सचिन यांचे पार्थिव सोमवारी (दि. ७) सकाळी विमानाने ओझर येथे येणार आहे. तेथून वडनेरभैरव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आदी परिवार आहे.