Navegaon/Bandh police: अवैध धंद्यांना उत; ठाणेदारांना हटविण्याची मागणी

2 hours ago 1

अर्जुनी मोर (Navegaon/Bandh police) :  गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध हे राष्ट्रीय उद्यान असुन या ठिकाणी दररोज शेकडो पर्यटक येतात. नवेगाव-बांध-कोहमारा मार्गावरील दोन आणि नवेगाव/बांध राष्ट्रीय उद्यान मार्गावर दोन लाज असून जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील शाळेतील कमी वयाची मुले-मुली या लाजवर येऊन अश्लील चाळे . करतात. राष्ट्रीयउद्यान मार्गावरील लाज रस्त्याच्या कडेला असल्याने असले चित्र येणारा जाणाऱ्या पर्यटकांना पाहावले जात नाही. यामुळे राष्ट्रीय उद्यानाकडे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

नवेगाव/बांध परिसरात दारु,सट्टा,जुगार,कोंबडा बाजार, मोबाईल फोनच्या चोऱ्या,जनावरांची वाहतुक केली जाते. अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आणि केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी आपल्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद केल्यामुळे नवेगाव/बांध व परिसरात अवैध दारु,सट्टा,जुगार मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. नवेगाव/बांध पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक योगीता चाफले यांच्या आशीर्वादाने अवैध दारु,सट्टा,जुगार,कोंबडा बाजार, गोतस्करीचे धंदे जोमात सुरु आहेत.

दिवसाढवळ्या आठवडी बाजारातून 8-10 मोबाईल फोनच्या चोऱ्या होत असतात आणि मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांचा पत्ता लागत नाही. रेती,माती,मुरूम अशा अवैध गौण खनिजाला आळा घालण्यासाठी पोलीस अधिकारी अकार्यक्षम असुन सबंधित पोलीस अधिकारी यांना तात्काळ हटविण्यात यावे . नवेगाव/बांध या राष्ट्रीय उद्यानाच्या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशन ला कर्तव्यदक्ष ठाणेदाराची नियुक्ति करुन नवेगाव/बांध पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी आता नागरिकांनी केली असुन सबंधित पोलीस अधिकारी यांना हटविण्याची मागणी शुध्दा नागरिकांनी केली आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतो याकडे जनतेचे लक्ष्य लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article