IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराहचं प्रमोशन

2 hours ago 1

बीसीसीआय निवड समितीने न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील 3 सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जसप्रीत बुमराह याला प्रमोशन देण्यात आलं आहे. बुमराहची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चौघांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु

दुसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे

तिसरा सामना, 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article