श्रीरामाच्या 61 फुटी शिल्पाचे लोकार्पण:भाविकांच्या आस्थेचा विचार करून पुतळा उभारण्याचा संकल्प- आमदार राहुल ढिकले

4 hours ago 1
नाशिकमध्ये आज श्रीरामाच्या 61 फुटी शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला इस्कॉन संस्थेचे वैश्विक सदस्य गौरांग प्रभुजी, गुरुजी रुग्णालयचे अध्यक्ष विनायकरावजी गोविलकर, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप, महाराष्ट्र भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने आदी उपस्थितीत होते. हा पुतळा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड राहुल ढिकले यांनी उभारला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून माध्यमातून पाच कोटींचा निधीतून रामसृष्टीत 61 फुटी प्रभू श्रीरामांचे शिल्प उभारण्यात आले. नाशिक महापालिकेने जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेतंर्गत तपोवनात पाच एकर जागेत रामसृष्टी उद्यान उभारले. देशभरातूनच नव्हे, जगभरातून येणाऱ्या भक्त भाविकांप्रमाणेच पर्यटक तपोवनात देखील येत असतात. यामुळे पुर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड राहुल ढिकले यांनी तपोवनातील रामसृष्टी मध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचे शिल्प उभारण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी 11 ऑक्टोंबर 2022 मध्ये राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तपोवनातील रामसृष्टी उद्यानात जागा उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या. जागेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर फुटी शिल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रामसृष्टी मध्ये प्रभू रामचंद्रांचे शिल्प उभारण्याबरोबरचं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कारंजा व विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुशंगाने पर्यटन विभागाने प्रस्तावाला मंजुरी देताना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 10 फेब्रुवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. पाहा व्हिडिओ... धार्मिक शक्तीस्थळे व पर्यटन प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीस धार्मिकदृष्ट्या महत्व आहे. मोठ्या संख्येने देश विदेशातील भक्त व पर्यटक येतात. तपोवनात गोदा-कपिला संगम, श्रीराम-सीता मातेची झोपडी, शूर्पनखेचे नाक कापल्याच्या अख्यायिकेचे स्थळ, राम-लक्ष्मण मंदिर अशी कितीतरी शक्तीस्थळे भाविकांप्रमाणेच पर्यटकांना खेचून आणतात. श्रीरामांचे शिल्प उभारताना फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमर या मटेरियलचा वापर करण्यात आलेला आहे. धातूंच्या मूर्तीवर होणाऱ्या ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार करून या मूर्तीमध्ये फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा यावर कुठलाही दुष्परिणाम होणार नसून हे अधिक टिकाऊ असणार आहे. सदरचे काम बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपअभियंता अविनाश देवरे आणि शाखा अभियंता मयूर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. मटेरियल : फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमर (एफआरपी), श्रीरामांच्या मूर्तीची उंची : 61 फूट (चार भागांमध्ये मूर्ती आणण्यात आली असून नाशिकमध्ये जोडण्यात आली आहे.), चौथरा : 15 फूट, भव्य असा भगवा ध्वज लावण्यासाठी पुतळ्यापेक्षा मोठा ध्वजस्तंभ, श्रीरामांच्या पुतळ्याभोवती संगीत कारंजे, सजावटीचे दिवे, आणि आकर्षक विद्युत रोषणाई, कालावधी : सहा महिने, ठेकेदार : मॉडेल आर्ट वर्क्स, छत्रपती संभाजी नगर हे असून वास्तुविशारद धीरज पाटील आहे. या पुतळ्याचे विविध भाग हे चेन्नई, पुणे नागपूर येथे बनविण्यात आले आहे. तपोवनात भाविकांना आकर्षित करण्यासाठी उभारला पुतळा- राहुल ढिकले आमदार अॅड. राहुल ढिकले म्हणाले की, श्रीरामांचे वास्तव्य असलेल्या तपोवनात भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणावे तसे काहीच नव्हते. भाविकांच्या आस्थेचा विचार करून श्रीरामांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला. श्रीरामांचे तपोवनातील वास्तव्य आणि कुंभमेळा या धर्तीवर पर्यटनाला चालना मिळावी हा देखील यामागील उदात्त हेतू आहे. हा पुतळा बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून अर्थचक्र फिरण्यास मदत होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article