टाटा ट्रस्टचे प्रमुख नोवेल टाटा हे टाटा सन्सचे प्रमुख का नाही बनू शकत, हे आहे कारण

3 hours ago 1

रतन टाटांच्या निधनानंतर टाटा उद्योगाची जबाबदारी आता त्यांचे सावत्र भाऊ नोवेल टाटांकडे सोपवली गेलीय. टाटांच्या अंत्यविधीनंतर मुंबईत टाटा ट्रस्टच्या बैठकीत नोवेल टाटांची प्रमुख म्हणून सर्वानुमते निवड झाली. 148 वर्षांपासूनच्या टाटा उद्योग समुहाच्या वाटचालीत आतापर्यंत 9 जणांची प्रमुखपदी निवड झाली आहे. त्या 9 पैकी 6 जण टाटा घराण्यातून राहिले आहेत. तर इतर 3 प्रमुख टाटा घराण्याच्या बाहेरचे होते.

टाटा कुटुंबातले पहिले चेअरमन जमशेदजी टाटा होते. 1868 ते 1904. दुसरे त्यांचे पुत्र दारोबजी टाटा (1904–1932) यानंतर तिसरे टाटा ग्रृपचे प्रमुख नौरोजी सकलतवाला बनले. सकलतवाला हे जमशेदजी टाटांच्या बहिणीचे पुत्र आणि पहिले बिगरटाटा अध्यक्ष राहिले.( १९३२-१९३८ ). पुढे जमशेदजींचे दुसरे पुत्र जेआरडी टाटा अध्यक्ष सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर राहिले. ( (1938–1991 ) 1991 पासून ते 2012 पर्यंत जहाँगीर रतनजी टाटांनी दत्तक घेतलेल्या नवल टाटांचे पुत्र रतन टाटा अध्यक्ष राहिले. रतन टाटांच्या निवृत्तीनंतर सायरस मिस्रींनी 4 वर्ष अध्यक्षपद भूषवलं. सायरस मिस्री हे रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटांचे मेहुणे होते. (( 2012 ते 2016 )) आता रतन टाटांच्या निधनानंतर नोएल टाटा प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत

जमशेदजी टाटांचे पुत्र जहांगीर रतनजी टाटांनी नवल टाटांना दत्तक घेतलं होतं. नवल टाटांना सुनी आणि सिमोन अशा दोन पत्नी होत्या. सुनी पत्नीपासून रतन आणि जिमी टाटा तर सिमोन नावाच्या पत्नीपासून नोएल टाटा असे ३ पुत्र झाले. तेच नोएल टाटा आता टाटा समुहाचे प्रमुख बनले आहेत.

नोएल टाटा हे टाटा समुहाशी ४० हून अधिक काळापासून कार्यरत आहेत. अनेक काळ ते टाटा इंटरनॅशनलचे प्रमुख होते..टाटा ट्रेंड, वोल्टाज, टाटा इन्व्हेस्टमेंट अशा कंपन्यांचीही जबाबदारी नोएल टाटांकडे होती. टाटा ग्रृप हा टाटा सन्स या कंपनीशी संचलित आहे. टाटा कंपनीत टाटा सन्स यांचाच 66 हून अधिक टक्के भागभांडवल आहे.

नोएल टाटा हे आता टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकणार नाही. कारण 2022 मध्ये टाटा सन्स बोर्डाने एका कायदा बनवला होता. त्यानुसार एकच व्यक्ती ही दोन पदावर राहू शकणार नाही. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे अध्यक्षपद भूषवणारे रतन टाटा हे शेवटचे व्यक्ती होते. नोएल टाटा हे टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. यासाठी त्यांना आधी टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article