मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

3 hours ago 1

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शिंदे सेनेच्या वाटेवरPudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

11 Oct 2024, 6:08 pm

Updated on

11 Oct 2024, 6:08 pm

मालवण : मागील काही महिने ठाकरे शिवसेनेपासून अलिप्त असलेले मालवणचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुंबई ठाणे येथील संकल्प नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मालवण शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

सुमारे अडीज वर्षापूर्वी मालवणच्या नगरध्यक्ष पदाची मुदत संपल्यानंतर मालवणचे तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे गेले वर्षभर ठाकरे शिवसेनेपासून काहीसे अलिप्त होते. ठाकरे शिवसेनेतील नाराजीमुळे संघटनेपासून अलिप्त महेश कांदळगावकर अलिप्त होते. दरम्यानच्या कालावधीत मालवण शहरातील विकास कामांबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही कांदळगावकर यांनी भेट घेतली होती. या भेटीमुळे श्री. कांदळगावकर हे भाजपात जातील अशी चर्चा होती. मात्र महेश कांदळगावकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज मुंबई ठाणे येथील शिंदे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होत असलेल्या संकल्प नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यक्रमात महेश कांदळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article