Vasmat Shiv Sena: वसमतची जागा शिवसेनाच लढविणार…

3 hours ago 1

‘हरिद्रा’चे अध्यक्ष हेमंत पाटलांच्या विधानाने उंचावल्या अनेकांच्या भुवया

हिंगोली (Vasmat Shiv Sena) : वसमत विधानसभेची जागा सन १९९० पासून शिवसेनेकडे असल्याने महायुती अंतर्गत ही जागा शिवसेनाच (Shiv Sena) लढविणार, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वसमत येथील हळद संशोधन केंद्राला निधी मिळाल्याची माहिती देण्यासाठी केंद्राचे अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी वसमत विधानसभेची जागा मागील सन १९९० पासून शिवसेनेकडे असल्याने आगामी निवडणुकीत महायुती अंतर्गत ही जागा शिवसेनाच लढविणार, असे विधान त्यांनी केले. वसमत विधान सभा मतदार संघाचे आमदार राजू भैय्या नवघरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून तेच आगामी विधानसभेत महायुतीचे उमेदवार समजले जात आहेत.

असे असताना हेमंत पाटील यांनी ही जागा शिवसेना (Shiv Sena) लढविणार असे सांगितल्याने महायुती अंतर्गतही सारे काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मुलाखतीत आपला विधानसभा निवडणूक लढविण्याचा विचार नसल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. ते खासदार असताना वसमत विधानसभेतून ते निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मित्र पक्षाच्या नेत्यांनी हा ‘नॅरेटिव्ह’ सेट केला होता. हेमंत पाटलांचा हा अंगुलीनिर्देश कुणाकडे आहे, याबाबतही चर्चा होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article