NCP शरद पवार गटात मोठी इनकमिंग:सतीश चव्हाणांनी घेतली पवारांची भेट, आदिती तटकरेंविरोधातील नेत्याचा आज पक्षप्रवेश

4 hours ago 1
विधानसभा निवडणुकीसाठी 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले एकेक पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावल्यानंतर त्यांनी आता अजित पवारांचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांनाही आपल्या गळाला लावले आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी नुकतेच महायुती सरकारवर टीका करणारे एक खरमरीत पत्र लिहिले होते. यावरून त्यांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होत आहे. सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी आज शरद पवारांच्या त्यांच्या येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट केली. या घटनाक्रमामुळे सतीश चव्हाण लवकरच शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांची घेराबंदी दुसरीकडे, शरद पवारांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची कोंडी करण्याचीही व्युहरचना आखली आहे. आदिती तटकरे विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघाचे नेतृत्व करतात. आता शरद पवारांनी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे स्थानिक नेते ज्ञानदेव पवार यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. ते आज पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करतील. ज्ञानदेव पवार हे माणगावचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे रायगडमध्ये महाविकास आघाडीची ताकद चांगलीच वाढणार आहे. नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा होईल. नवाब मलिक, सना मलिक विधानसभेच्या आखाड्यात उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा नवाब मलिक व त्यांच्या कन्या सना मलिक या दोघांनाही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे संकेत दिलेत. नवाब मलिक आपल्या पारंपरिक शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. तर सना मलिक अणुशक्ती नगरमधून रिंगणात उतरणार आहेत. नवाब मलिक 28 ऑक्टोबर, तर सना मलिक 23 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज आहे. हे ही वाचा... भाजप हरियाणासारखी महाराष्ट्रात बाजी मारणार?:शिंदेंच्या मराठा चेहऱ्यासह बसप, MIM चे एकेक मत महायुतीला लाभ पोहोचवणार मुंबई - हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप बॅकफूटवर राहून पराक्रम गाजवण्याचा विचार करत आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत हरियाणात फारसे यश मिळाले नाही. पण त्यानंतर विधानसभा निवडणूक येईपर्यंत भाजपने येथील हरलेली लढाई जिंकून दाखवली. महाराष्ट्रातही असेच काही घडू शकते. महाराष्ट्रातही भाजपप्रणीत महायुतीला लोकसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. आता हरियाणासारखा डाव टाकून भाजप महाराष्ट्रातही बाजी मारण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेवर काम करत असल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article