NCPच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप:ठराविक भाग काढण्याचे निर्देश, 'पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी' निरीक्षण नोंदवले

1 hour ago 1
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवीन टीव्ही जाहीरात काढण्यात आली आहे. आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार, अशा आशयाची ही जाहीरात आहे. मात्र, या जाहिरातील एका दृष्यावर राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच जाहिरातीच्या मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ईसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय प्रमाणिकरण समितीसमोर निवडणूक प्रचारासाठी आपल्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज केला होता. राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला आहे. पोल बॉडीने जाहिरातीतील एक संवाद 'पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी' असल्याचे म्हटले आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षाला जाहिरात प्रसारीत करण्यासाठी हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. जाहीरातीवर का घेतला आक्षेप? अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीव्ही जाहीरातीत एक पत्नी आपल्या पतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या योजनांची माहिती देते, आणि शेवटी आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या. नाहीतर, आज रात्री मी तुम्हाला जेवायला देणार नाही, असे विनोदाने म्हणते. याच दृष्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. हे ही वाचा... विधानसभेला गंमत करू नका नाही तर जंमत होईल:अजित पवार यांचे बारामतीकरांना आवाहन; म्हणाले - कुणात किती धमक याचा विचार करा लोकसभा निवडणुकीसारखी या निवडणुकीत गंमत करू नका, नाही तर तुमची जंमत व्हायची, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला या विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करताना म्हटले आहे. शरद पवारांनी दीड वर्षांनंतर आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तुमचे कोण काम करणार? कुणात काम करण्याची धमक आहे? याचा विचार करा, असेही ते यावेळी म्हणाले. सविस्तर बातमी वाचा... शरद पवारांचा फोटो वापरू नका:स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जा, सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत आज 13 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पाडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे फोटो वापरु नका. स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजितदादाच्या गटाला दिले आहेत. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article