गोंदिया (Gondia):- २० नोव्हेंबर मतदानाचा(Voting)दिवस जवळ येत आहे. यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. यातंर्गत १८ व १९ नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात आला. या मोहिमेनुसार १८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ८ लाख ५० हजार मतदारांना पोलचिट्टी (चिट्टी) वाटप करण्यात येणार आहे. यासाठी यंत्रणेने कंबर कसलीही अधिकारी, कर्मचार्यांना कामाला लावण्यात आले आहे.
मतदारांना जनजागृती करण्याचा संकल्प
ग्रामीण व शहरी भागात गाव पातळीवर मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा यंत्रणेने कंबर कसली आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ ‘स्वीप’ कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृतीच्या दृष्टीने ग्रामीण भागात मतदान वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन ग्राम पंचायत,शाळा व आरोग्य विभागाला विविध नाविण्यपुर्ण उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात रांगोळी, बँनर, पोष्टर, प्रभातफेरी, मोटार बाईक व सायकल रँली असे विविध माध्यमांचा वापर करण्यात आला. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी १८ ते १९ ह्या दोन दिवस विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत १८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल ८ लाख ५० हजार मतदारांना मतदान आवाहन चिट्ठी वाटप करुन मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
८ लाख ६१ हजार मतदारांना मतदान आवाहन चिट्ठी वाटप करण्याचे उद्दिष्ट
यासाठी शासकिय शाळेतुन २ लाख, खाजगी शाळेतुन २ लाख, अंगणवाडी केंद्रातुन एख लाख ८४ हजार, नगर परिषदेमार्फत शहरी भागात ३२ हजार, राज्य परिवहन महामंडळ(State Transport Corporation) मार्फत प्रवासी यांना २० हजार, रेल्वे विभागातुन प्रवासी यांना १० हजार, माविम महामंडळातुन १० हजार, पंचायत विभागातुन ग्रामस्तरावर १ लाख ६० हजार, आरोग्य विभागातील बाह्यरुग्ण विभागातुन २५ हजार, पशु वैद्यकीय विभागातुन २० हजार असे एकुण एकाच दिवशी ८ लाख ६१ हजार मतदारांना मतदान आवाहन चिट्ठी वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
३१८ बीएलओ करणार २.५० लाख चिट्टींचे वाटप
नवेगावबांध निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसा निवडणूक यंत्रणेत लगबग वाढताना दिसून येत आहे. यातही प्रशासनाने कंबर कसली असून अर्जुनी मोरगाव मतदार संघात प्रत्येक मतदाराला मतदार चिट्ठी (पोलचीट) पोहचवण्याची जबाबदारी ३१८ मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांवर (BLO) सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ७ दिवसात २ लाख ५० हजार मतदार चिट्ठी वाटप करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तर मतदार संघातील ३१८ मतदान केंद्राचा भारही बीएलओंना पेलावे लागणार आहे.
अर्जुनी मोरगाव मतदार संघातील मतदार
पुरुष-१,२८,९७०.
स्त्रिया-१,२९,९९६.
एकूण मतदार-२,५८,९६६.
एकूण मतदान केंद्र -३१८
एका मतदान केंद्रकरिता १ बीएलओ
गोरेगाव- ५६
सडक अर्जुनी-१२०
अर्जुनी मोरगाव-१४२
बीएलओ-३१८