New Mumbai Airport: नवी मुंबईतील विमानतळावर हवाईदलाच्या विमानांची भरारी, धावपट्टीची चाचणी यशस्वी

2 hours ago 1

भारतीय हवाईदलाचे 'सी 295' विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. लँण्डींग पूर्वी विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला 'वॉटर सॅल्यूट' करण्यात आले.

 नवी मुंबईतील विमानतळावर हवाईदलाच्या विमानांची भरारी, धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवी मुंबई विमानतळावर पहिले विमान लॅण्डींग

| Updated on: Oct 11, 2024 | 12:28 PM

नवी मुंबईकरांच्या प्रतिक्षेतील असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली. भारतीय हवाईदलाचे ‘सी 295’ विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. लँण्डींग पूर्वी विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले. या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान या विमानतळावरुन मार्च २०२५ महिन्यात देशांतर्गत विमाने सुरु होणार असून आंतरराष्ट्रीय विमाने जून २०२५ पासून सुरु करण्याचा मानस सिडकोचे अध्यक्ष अन् आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

विमानाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टीची पाहणी केली. तसेच विमानाची पाहणी केली. हवाईदलाचे हे मोठे विमान आहे.

बातमी अपडेट होते आहे. 

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article