Paddy burnt: धानाचे पुंजणे जळाले; ३.५० लाखांचे नुकसान

19 hours ago 1

बाराभाटी येथील घटना

अर्जुनी मोरगाव (Paddy burnt) : तालुक्यातील बाराभाटी येथे कापणी करून मळणीसाठी ठेवलेले धानाच्या पुंजण्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामुळे धानाचे पुंजणे जळून खाक झाले. या घटनेत शेतकरी रमणलाल राणीदान चांडक यांचे ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाले. ही घटना आज (ता.२६) पहाटे २ ते ३ वाजता सुमारासची आहे.

अर्जुनी मोरगाव येथील व्यवसायिक रमणलाल राणीदान चांडक यांची बाराभाटी येथे शेती आहे. सदर शेती ठेका पद्धतीने बाराभाटी येथील किशोर बेलखोडे, महेश बेलखोडे व भोजराज बेलखोडे यांना देण्यात आली आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी करून मळणीसाठी शेतातील बांधावरच पुंजणे करून ठेवले होते. मात्र २६ नोव्हेंबर च्या पहाटे काही अज्ञात इसमानी दोन्ही पुजन्यांना आग लावल्याने दोन्ही पूजने (Paddy burnt) जळून खाक झाले आहेत.

त्यामुळे सदर शेतकर्‍यांचे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. या (Paddy burnt) घटनेची तलाठ्याला माहिती देण्यात आली. तलाठी सुनील राठोड यांनी मौका चौकशी करून पंचनामा केला आहे. सदर शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत. तर त्या अज्ञात इसमांचा शोध घेवून कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी परिसरात केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article