PAK vs ENG : साजिद खानचा इंग्लंडला दणका, पाहुण्याचं 291 वर पॅकअप, पाकिस्तानला 75 धावांची आघाडी

2 hours ago 1

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा मुल्तान येथे खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानने इंग्लंडला तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 291 धावांवर ऑलआऊट करत 75 धावांची निर्णायक आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 366 धावा केल्या होत्या. इंग्लंडला या प्रत्युत्तरात 67.2 ओव्हरमध्ये 291 पर्यंतच पोहचता आलं. पाकिस्तानचा साजीद खान याने इंग्लंडला दणका दिला. साजीदने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्याने इंग्लंडला 300 च्या आत रोखण्यात यश आलं. इंग्लंडला तिसऱ्या दिवशी 4 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 52 धावाच करता आल्या. पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 बाद 259 धावा केल्या होत्या. आता पाकिस्तान या निर्णायक आघाडीसह इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.

हे सुद्धा वाचा

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article