Parbhani: 60 वर्ष इसमाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

2 hours ago 1

परभणी/सेलू (Parbhani):- तालुक्यातील देऊळगाव गात येथे पांडुरंग बापूराव कदम वय वर्ष 60 राहणार देऊळगाव गात यांनी दिनांक 23 सप्टेंबर च्या रात्री 8 पासून ते दिनांक 24 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातुन व दारू पिऊन आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातुन व दारू पिऊन आपल्या राहत्या घरी आत्महत्या

या आत्महत्या ची माहिती सेलू पोलीस स्टेशनला मिळतात सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेता उत्तरीय तपासणी देऊळगाव गात प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Health Centers) डॉक्टर संजय लोया यांनी केले असून नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार ज्ञानेश्वर जानकर, मनोहर कोपनर, शिवदास सूर्यवंशी हे करीत आहेत अशी माहिती बीट जमादार ज्ञानेश्वर जानकर यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article