Parbhani accident: रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच; पायी जाणाऱ्या ज्येष्ठाला ट्रक ने चिरडले

2 hours ago 1

Parbhani Accident:- आधीच अरुंद असणाऱ्या व दुतर्फा प्रचंड अतिक्रमणे, हातगाडे व विक्रेत्यांच्या विळख्यात लुप्त वसमत रस्त्यावर सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पादचाऱ्याचा बळी गेला. राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वसमत रस्त्यावर हॉटेल (Hotel)गुलमोहर समोरील बाजूने अंदाजे 50 वर्षीय एक व्यक्ती दुभाजक ओलांडून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत होता,त्यावेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने या पादचाऱ्यास जोरदार धडक दिली ,ज्यात व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.

अतिक्रमण कमी करण्याची शहरवासीयांकडून मागणी

या घटनेनंतर ट्रकसह ट्रक चालक घटनास्थळावरून फरार होण्याच्या प्रयत्नात होता, परंतु सतर्क नागरिक व पोलिसांनी ट्रक अडवून ट्रक चालकास ताब्यात घेऊन परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले दरम्यान अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव व पत्ता अद्याप पर्यंत कळाला नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article