शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी
परभणी (Parbhani Assembly Elections) : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होईल. जिल्ह्यातील चारही विधानसभेत ५६ टेबलवर मतमोजणीच्या ११८ फेर्या होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गुरुवारी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप जिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची उपस्थिती होती.
जिंतूर विधानसभेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी (Parbhani Assembly Elections) मतमोजणी होणार असून १४ टेबलवर मतमोजणीच्या ३२ फेर्या होतील. पोस्टल मतमोजणी ७ टेबलवर होईल. परभणी विधानसभेसाठी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय वनामकृवि येथे मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी १४ टेबलवर मतमोजणीच्या २५ फेर्या होतील. ६ टेबलवर पोस्टल मतदानाची मोजणी होईल. गंगाखेड विधानसभेसाठी संत जनाबाई महाविद्यालय कोद्री रोड येथे मतमोजणी होणार असून १४ टेबलवर मतमोजणीच्या ३१ फेर्या होतील. पोस्टल मतमोजणी ८ टेबलवर होईल. पाथरी विधानसभेत १४ टेबलवर मतमोजणीच्या ३० फेर्या होतील. ७ टेबलवर पोस्टल मतमोजणी होईल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाथरी येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी करीता नेमण्यात आलेले मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि सुक्ष्म निरीक्षक यांचे रॅण्डमायझेशन करण्यात आले असून विधानसभा निहाय कर्मचारी नेमणुका करण्यात आल्या आहेत.
मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास परवानगी नाही. (Parbhani Assembly Elections) मतमोजणी परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुरविलेल्या पासेस किंवा इसीआयकडील पासेस असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
शनिवार रोजी चौदा टेबलवर होणार मतमोजणी एकुण ३१ फेऱ्या
परभणी/गंगाखेड: विधानसभा निवडणुकीची (Parbhani Assembly Elections) मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून शहरातील संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात चौदा टेबलवर केली जाणार आहे. मतमोजणी च्या एकुण ३१ फेऱ्या व ८ टेबलवर टपाली मतांचो मोजणी होणार असुन गंगाखेड विधानसभेचा आमदार कोण याचे चित्र शनिवार रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
गंगाखेड विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवार २० नोव्हेंबर रोजी पार पडली. याची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून शहरातील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात चौदा टेबलवर केली जाणार आहे. गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील मतदान केंद्रापासून सुरु होणाऱ्या मतमोजणीचा शेवट मानकादेवी येथील मतदान केंद्रावर होणार आहे. यात (Parbhani Assembly Elections) गंगाखेड, पालम व पूर्णा या तिन्ही तालुक्यातील मतदान केंद्राच्या अनुक्रमांकानुसार प्रत्येकी १४ मतदान केंद्राच्या ३० व १२ मतदान केंद्राची १ अशा एकुण ३१ फेऱ्यात ४३२ मतदान केंद्रातील मतमोजणी पूर्ण केली जाणार असुन पोस्टल मताची मोजणी ८ टेबलवर केली जाणार आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या गंगाखेड विधानसभेच्या निवडणुकीतील तिरंगी लढतीत विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे दुसऱ्यांदा निवडून येणार की महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम बाजी मारणार वा या दोघांना बाजूला करत या निवडणुकीत अपक्ष न लढता प्रथमच वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी घेत निवडणुक लढविणारे माजी आ. सिताराम घनदाट मामा आपला झेंडा रोवत चौथ्यांदा विधान भवनात प्रवेश करणार हे मात्र शनिवार रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
१४ टेबलावर ३० फेरीत होणार मतमोजणी
पाथरी : ९८- पाथरी विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीची (Parbhani Assembly Elections) मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली असुन शनिवार २३ नोव्हेंबर रोजी शहराशेजारील शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे . यासंदर्भात निवडणुक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती दिली आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात ३ लाख ९३ हजार २४४ मतदारांपैकी पुरुष १ लाख ४७ हजार १४६ तर १ लाख ३१ हजार ९५८ स्त्री मतदार मिळून २ लाख ७९ हजार १०४ ( ७०.९८ टक्के ) मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. शनिवार २३ नोव्हेंबर रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी ८ वा. सुरू होणार असून निवडणूक विभागा ने मतमोजणीसाठी तयारी सुरू केली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांसाठी शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वा. पाथरीतील शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मतमोजणी दिवशी प्रथम टपाली मतपत्रिका व सैन्य दलातील मतदार या मतांची मोजणी होणार असून त्यानंतर ईव्हीएम वरील नोंदवलेले मतदानांची १४ टेबलावर एकूण ३० फेरीत मतमोजणी होणार आहे . त्यासाठी प्रत्येक टेबलावर एक सूक्ष्म निरीक्षक एक मतमोजणी सुपरवायझर व एक मतमोजणी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Parbhani Assembly Elections) मतमोजणीच्या दिवशी मत मोजण्याचा ठिकाणी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सकाळी ७ वा. उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.
निवडणूक निरीक्षक संचिता बिश्नोई यांनी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणची केली पाहणी
पाथरी विधानसभा मतदारसंघातील (Parbhani Assembly Elections) ईव्हीएम ठेवलेल्या शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी निवडणूक निरीक्षक संचिता बिश्नोई यांनी केली . यावेळी मतदान केंद्र अध्यक्षांनी दिलेल्या दैनंदिनी व १७ सी -वोटर रजिस्टर याची तपासणी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी प्रतिनिधी समोर तपासणी व मत मोजणी ठिकाणची पाहणी त्यांनी केली . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंगाचे माचेवाड उपस्थित होते.