अपघाती मृत्यू प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर कोतवाली पोलिसात गुन्हा
परभणी (Parbhani decease case) : येथील बसस्थानक परिसरात एका ७५ वर्षीय वृध्दाचा मृतदेह शुक्रवार ३१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास आढळून आला. मयताच्या अंगावर जखमा आहेत. वृध्दाचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाला असावा, असा संशय आहे. या (Parbhani decease case) प्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात वाहन चालकावर कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. नातेवाईकांनी वृध्दाचा मृत्यू बसच्या धडकेत झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
साहेबराव पिराजी हनवते वय ७५ वर्ष, रा. कौटंबवाडी ता. जि. परभणी, असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी संबंधिताचा मृतदेह बसस्थानक परिसवरामध्ये आढळून आले. घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक संजय ननवरे, पोउपनि. बालासाहेब चव्हाण, पोलीस अंमलदार हनुमंत अनंत कुरे, पवन निळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात (Parbhani decease case) घेत उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.