परभणी/जिंतूर(Parbhani) :- महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी माझी निवड केली. तुमची काळजी घेणारी व्यक्ती योग्य असली पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आणि माझी निवड आ. मेघनाताई बोर्डीकर या आहेत. त्या भविष्याचे चित्र आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आ.मेघनाताईंची निवड करुन सभागृहात पाठवा, असे आवाहन भाजपा नेत्या आ. पंकजाताई मुंढे यांनी केले.
प्रचारसभा मेघना बोर्डीकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
जिंतूर – सेलू विधानसभा (Assembly) मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार आ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ शनिवार १६ नोव्हेंबर रोजी आ.पंकजाताई मुंढे यांची सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना आ. पंकजाताई म्हणाल्या की, मागील पाच वर्षात आ. मेघनाताई बोर्डीकर यांनी जिंतूर – सेलू मतदार संघात महायुती सरकारच्या योजनां पोहचवून मतदार संघाचा विकास केला आहे. आज आम्ही दोघी एका मंचावर उभ्या आहोत, याचा अर्थ हा केवळ वर्तमानच नाही, तर उज्ज्वल भविष्याचा देखील आहे. आम्ही आमच्या वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेतो आहोत. जातीपातीच्या भिंती तोडत, मुंडे आणि बोर्डीकर कुटुंब एकत्र येऊन जिंतूर आणि सेलूच्या जनतेचे भविष्य घडवण्याचे काम करीत आहेत. पुढे महायुतीचे राज्यात सरकार येणार आहे. त्या करीता आ. मेघनाताईंना आपण बळ द्या, असे आवाहन आ.पंकजाताई मुंढे यांनी केले.
आम्ही आमच्या वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेतो आहोत
यावेळी मंचावर आ. मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह प्रताप देशमुख, सुरेश भुमरे, प्रमोद कराड, डॉ.पंडित दराडे, गोविंद थिटे, विद्याताई चौधरी, रामराव घुगे, भागवत दळवे, किशोर जाधव, विलास गीते, माधव दराडे, सुनिल घुगे, लक्ष्मण इलग, रवी घुगे, सुनिल भोंबे, गोपाळ रोकडे, गणेश कुर्हे, संगीता जाधव, आत्माराम पवार, रामभाऊ जाधव, वाल्मीक टाकरस, आवेज खा पठाण, अशोक बुधवंत, संदीप घुगे, जगदीश घुगे, नामदेवराव घुले, रामराव हुलगुंडे, भगवान महाळणर, रामप्रसाद घुले, गोविंद दायमा, रमण तोषणीवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विकास जाधव यांनी केले. प्रचारसभेत मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.