परभणी (Parbhani):- दवाखाना टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ (mental torture) करत घराबाहेर हाकलून दिले. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळीवर २ डिसेंबरला जिंतूर पोलीस ठाण्यात (Police stations) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
आसमा परवीन पठाण यांनी तक्रार दिली आहे. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी दवाखाना टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन असे म्हणत विवाहितेचा छळ केला. घरगुती क्षुल्लक कारणावरुन उपाशीपोटी ठेवून शारीरिक, मानसिक छळ दिला. पैशांसाठी विवाहितेला घराबाहेर हकलून दिले. या प्रकरणी मुद्दसीर पठाण, मो. मुजफ्फर पठाण, मो. जफर पठाण, अजुंम पठाण, शबाना पठाण यांच्यावर जिंतूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. देशपांडे करत आहेत.