परभणी (Parbhani):- तु मला खुप आवडतेस, तुझी बारावी झाल्यानंतर तुझ्या सोबत लग्न करणार आहे असे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवत अत्याचार (torture) करण्यात आला. ही घटना ताडकळस पोलिस ठाणे हद्दीतील गावात नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या दरम्यान घडली. पिडीतेच्या तक्रारीवरुन सदर प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परभणीतील ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिडीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. पिडीतेचे वडील व आरोपीचे वडील एकाच ठिकाणी काम करत असल्याने आरोपीचे पिडीतेच्या घरी येणे जाणे होते. घरात पिडीतेला एकटीच पाहुन तिला लग्नाचे अमिष दाखवत आरोपीने अत्याचार केला. यात पिडीता गर्भवती(pregnant) झाली. सदर प्रकरणी आरोपी माधव गलांडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. काठेवाडे करत आहेत.