Parbhani: सहायक निबंधक कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

2 hours ago 1

परभणी/पाथरी (Parbhani):- पाथरी येथे सहाय्यक निबंधक (सहकार) यांचे कार्यालय मंजूर करणे बाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अप्पर मुख्य सचिव सहकार यांना दिले आहेत. पाथरी तालुका हा निजाम काळापासूनचा जुना तालुका आहे. पाथरी तालुक्याचे विभाजन (Division) होऊन सन १९९८ दरम्यान मानवत या नवीन तालुक्याची निर्मिती झाली. विभाजन झालेल्या मानवत तालुक्याला सहाय्यक निबंधक (सहकार) कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. परंतु जुना तालुका असलेल्या पाथरी येथे सहाय्यक निबंधक कार्यालयाची स्थापना झालेली नाही.

आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश

आजही पाथरी तालुक्यातील गावांमधील सहकारी संस्था, बँका व विविध सहकार विषयक कामांसाठी पाथरी तालुक्यातील लोकांना सेलू येथेच जावे लागते. सेलू येथील सहकार निबंधक कार्यालयातून सेलू तालुक्याचा कारभार चालतो. त्या कार्यालयावर पुन्हा पाथरी तालुकाचा भार पडत असल्याने सेलू येथील कर्मचाऱ्यावर अतिरिक्त भार पडतो तर जनतेलाही कामासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. सोबतच पैशाचा व वेळेचा अपव्यय ही सहन करावा लागतो. यासंदर्भात एक निवेदन आमदार राजेश विटेकर यांनी सहकार मंत्री यांना भेटून पाथरी येथे सहाय्यक निबंधक (सहकार) विभागाचे तालुकास्तरीय कार्यालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावरून सहकार मंत्री यांनी अप्पर मुख्य सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत . अशी माहीती आ . राजेश विटेकर यांनी दिली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article