पाथरी तालुक्यात ८३ हजार ६९७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
लक्ष्मीअस्त्राचा प्रचंड मारा, जरांगे फॅक्टर वरपुडकरांच्या बाजूने?
परभणी/पाथरी (Pathari Assembly Elections) : पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले .यावेळी तालुक्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. निवडणुक रिंगणात उभ्या असलेल्या दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात लक्ष्मीअस्त्रांचा जोरदार मारा केल्याने तालुक्यातील सर्वच गावांमध्ये अक्षरशः पैशाची अतिवृष्टी झाली. एकीकडे सर्वच उमेदवार आपल्यालाच मताधिक्य मिळणार असल्याचे दावा करत असताना सबका माल अंदर केलेल्या (Pathari Assembly Elections) मतदारांनी नेमके काय केले? या संदर्भात अचूक अंदाज बांधणे राजकीय विश्लेषकांनाही कठीण झाले असून सर्वच नेत्यांचे कार्यकर्ते आता आकडेमोडीमध्ये व्यस्त झाले आहेत.
पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये (Pathari Assembly Elections) १४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. बुधवार 20 नोव्हेंबर रोजी या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. यावेळी पाथरी तालुक्यात असणाऱ्या १ लाख १९ हजार १०५ मतदारांपैकी ८३ हजार ६९७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात (Pathari Assembly Elections) पाथरी शहरातील २८ बुथ वर असणार्या ३२ हजार ३७१ मतदारांपैकी २२ हजार ५९३ ( ६९ . ७९ टक्के ) मतदारांनी मतदान केले. यामध्ये ११ हजार ८६७ पुरुष तर १० हजार ७२६ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर ग्रामीण भागात येणाऱ्या ९४ बुथ मधील ८६ हजार ७३४ मतदारांपैकी ६१ हजार १०४ ( ७०.२ टक्के ) मतदारांनी मतदान केले . यात ३२ हजार २८९ पुरुष व २८ हजार ८१५ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पेक्षा अधिक मतदान यावेळी झाले असून (Pathari Assembly Elections) लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आघाडी देणाऱ्या तालुक्यात आता १४ पैकी ५ दिग्गज उमेदवारांत सर्वाधिक मताची विभागणी होणार असून मूलभूत प्रश्नांना बगल देत जातीय समीकरणे व प्रचंड झालेल्या लक्ष्मी अस्त्राच्या मार्यात उमेदवार व मतदारांनी पहिल्यांदाच निवडणूक वेगळ्या वळणावर नेली आहे.
पाथरी शहरामध्ये (Pathari Assembly Elections) अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणी व रासपाचे सईद खान यांच्यामध्येच फाईट असल्याची चर्चा असून वरपूडकर व विटेकरांना शहरांमध्ये तिसऱ्या पसंतीचे मते मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीचे सुरेश वरपुडकर , रासपाचे सईद खान यांना मतदारांनी पसंती दिल्याची चर्चा आहे. अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणी व महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांना अपेक्षित मतदान मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
लक्ष्मी आस्त्राच्या अचानक केलेल्या मारामुळे शिट्टी चा आवाज शहरासह ग्रामीण भागात घुमला असून ऑटोरिक्षा पिकप घेत नसल्याचे लक्षात आल्याने रिक्षामध्ये बसलेला मराठा समाजाचा मतदाराने ऐनवेळी हाताला साथ दिल्याची चर्चाही होत आहे. (Pathari Assembly Elections) लाडक्या बहिणीच्या विश्वासावर बसलेल्या घडीला दाजीच्या शेतमालाला नसलेला भाव ,भाजपचा मित्र पक्ष असल्याने मराठा समाजाचा रोष असल्याने धोक्याची घंटी वाजवली असल्याचा शहराच्या चौकात व गावातल्या चावडीवर चर्चा ऐकायला मिळत आहे.
शहरात मुस्लिम मतांचे विभाजन झाल्याची चर्चा असून याचा थेट फटका दुर्राणी यांना बसला आहे. (Pathari Assembly Elections) पाथरी तालुक्यात जरांगे फॅक्टर चा प्रभाव असुन मराठा मते वरपूडकर यांच्या पारड्यात गेल्याची चर्चा जोर धरत आहे .सोबतच पाथरी तालुक्यामध्ये शिवसेना (उबठा ) गटाने यंत्रणा हातात घेत वरपुडकरांची विधानसभा मोहीम फते करण्यास मदत केल्याने त्यांचे पारडे पाथरी तालुक्यात जड भरणार असल्याचे म्हटले जात आहे. दुर्राणी व विटेकर यांना शहर व ग्रामीण भागात सईद खान यांनी डॅमेज केल्याची चर्चा असुन ओबीसींचे विभाजित झालेले मतदान सर्वाधिक सईदत खान यांच्याकडे गेल्याचेही एक चर्चा आहे.