पातूर (Patur Crime) : पातूर तालुक्यातील सावरखेड जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडण्याची घटना घडली होती. यावेळी ग्रामस्थ मागे लागल्याने गाडीतून पळून जाताना एका जणांचा खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. पैशाचा पाऊस पाडण्याकरिता अकोल्याच्या दोन मुलींना औषध देतो असे खोटे सांगून त्यांना सावरखेड जंगलात आणून त्यांच्याकडून पूजा करवून घेतली होती. याप्रकरणी मुलींच्या तक्रारीवरून पाच जणांच्या विरोधात (Patur Crime) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता दोघांना पातूर पोलिसांनी अटक केली आहे. पातूर तालुक्यामध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
पातूर तालुक्यातील (Patur Crime) सावरखेड जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडण्याकरिता १२ ते १३ जण सावरखेड जंगलात जमा झाले होते. यावेळी ग्रामस्थांना गोधन चोरणारी टोळी आल्याच्या संशयाने ग्रामस्थ एका गाडीच्या मागे लागले असता, त्या गाडीतून पळून जात असताना खोल दरीत पडून एकाचा मृत्यू झाला होता. सावरखेड जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडण्याकरिता दोन मुलींना पूजेत बसविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ‘त्या’ मुली आजारी असल्याने त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन उपचाराच्या नावाखाली त्यांना सावरखेड जंगलात आणून पैशाचा पाऊस पाडण्याच्या अघोरी कृत्यामध्ये त्यांना बसविण्यात आले होते. ही (Patur Crime) बाब पोलिसांच्या तपासात समोर आली होती.
पातूर पोलिसांनी या (Patur Crime) प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर ‘त्या’ मुलींची दिशाभूल फसवणूक करण्यात आली असल्याची प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी ‘त्या’ दोन मुलींच्या तक्रारीवरून पाच जणांच्या विरोधात यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता पातूर पोलिसांनी रियाज व पूजा करणारा राजू अवचार महाराज याला अटक करण्यात आली आहे.
३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
मुलींची फसवणूक झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रियाज व राजू महाराजांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या (Patur Crime) प्रकरणातील आणखी काही आरोपी अद्याप अटक होणे बाकी असून, पातूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.