Published on
:
02 Feb 2025, 1:37 pm
Updated on
:
02 Feb 2025, 1:37 pm
किनवट : येथे अज्ञात चोरट्यांनी नगरपरिषदेजवळील एका व्यापाऱ्याचे घर फोडून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही चोरीची घटना गुरूवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदेव मोहनलाल शर्मा हे व्यावसायिक दि. 26 जानेवारी रोजी कुटुंबियांसमवेत जगन्नाथपुरी येथे दर्शनासाठी गेले होते. घरी कोण नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील लोखंडी कपाट व तिजोरी उघडून त्यातील १ लाख ७० हजार रुपये, दागिने, विदेशी चलनाचे 60 युएस डॉलर, 45 युएई दीरहम आदी मिळून सुमारे एक लाख 80 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.
किनवट पोलिस ठाण्यात याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार हे करीत आहेत.